27 March Dinvishesh – महत्त्वाच्या आणि विशेष घटना
सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी इतिहासाशी संबंधित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात आणि इतिहासाच्या सामान्य जागृतीवर आधारित प्रश्न अनेकदा यूपीएससी आयएएस (नागरी सेवा परीक्षा), एसएससी, पीएससी, एमपीएससी, पोलीस भरती इत्यादी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये वापरले जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहासाचे प्रश्न महत्त्वाची भूमिका बजावतात. इतिहासातील काही महत्वाच्या प्रश्नांची यादी खाली दिलेल्या यादीत तयार केली आहे. जी तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगाला येईल. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि परीक्षेसाठी IHMSHILL.ORG कडून खूप खूप शुभेच्या.
जागतिक दिवस:
- जागतिक रंगभूमी दिवस
27 मार्च महत्त्वाच्या घटना:
1667: शिवाजी महाराजांची साथ सोडून मोगलांना जाऊन मिळालेले नेताजी पालकर यांचे सक्तीने धर्मांतर केले गेले.
1668: इंग्लंड देशाचे शासक चार्ल्स द्वितीय यांनी मुंबई प्रांताला ब्रिटीश शासकांच्या इस्ट इंडिया कंपनीच्या हवाली केलं
1794: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
1841: वाफेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची यशस्वी चाचणी सर्वप्रथम न्यूयार्क देशांत घेण्यात आली.
1854: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
1855: कॅनेडियन फिजिशियन(वैद्य) अब्राहम गेस्नर यांनी केरोसीन (रॉकेल) चे नमुने शोधले.
1871: पहिला आंतरराष्ट्रीय रग्बी सामना स्कॉटलंड आणि इंग्लंड या दोन राष्ट्रांच्या संघादरम्यान खेळण्यात आला.
1893: केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली.
1958: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
1961: साली पहिला जागतिक रंगमंच दिन साजरा करण्यात आला.
1966: 20 मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक 1983 मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.
1977: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग 747 प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन 583 जण ठार झाले.
1992: ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
2000: चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
2001: लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.
2004: नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-43 या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.
27 मार्च जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
1785: लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: 8 जून 1795)
1845: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: 10 फेब्रुवारी 1923)
1863: रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री रॉयस यांचा जन्म. (मृत्यू: 22 एप्रिल 1933)
1901: कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार (मृत्यू: 25 ऑगस्ट 2000)
1915: भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, गांधीवादी आणि उत्तर-पूर्व भारतीय आसाम राज्याच्या आमदार पुष्पलता दास यांचा जन्मदिन.
1917: भारतीय कवी कामाखी प्रसाद चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन.
1923: प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी विद्वान लीला दुबे यांचा जन्मदिन.
1939: भारतीय राजनेता बनवारी लाल जोशी यांचा जन्मदिन.
1954: मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचे प्रोफेसर हेमंत जोशी यांचा जन्मदिन.
1990: भारतीय फिल्ड हॉकी खेळाडू हरबीरसिंग संधू यांचा जन्मदिन.
२० मार्च मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
1898: सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.
1915: महान भारतीय क्रांतिकारक पंडित कांशीराम यांचे निधन.
1952: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा यांचे निधन. (जन्म: 11 जून 1894)
1967: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1890)
1968: युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.
1992: प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय.
1997: भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता.
2000: हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली.